यकृत प्रत्यारोपणातील पुण्याची नवी ओळख : डॉ. मनोज श्रीवास्तव यांचे अतुलनीय योगदान
गंभीर यकृत विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी ‘यकृत प्रत्यारोपण’ म्हणजे नवसंजीवनी. या क्षेत्रात पुण्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठाम ओळख निर्माण केली असून, त्यामागे रुबी हॉल क्लिनिकचे प्रोग्राम डायरेक्टर व चीफ ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. मनोज श्रीवास्तव यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे. गेल्या केवळ चार वर्षांत पुण्यात ३०० हून अधिक यकृत प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पाडणारे ते एकमेव डॉक्टर आहेत. तसेच त्यांनी वर्षभरात १०० हून अधिक प्रत्यारोपण पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, या प्रत्यारोपणांचा ९५ टक्क्यांहून अधिक यशदर आणि ९२ टक्के एक वर्षाचा सर्व्हायव्हल रेट हे त्यांच्या कौशल्याची साक्ष देणारे ठोस आकडे आहेत.
डॉ. मनोज श्रीवास्तव हे कॅडॅव्हेरिक लिव्हर ट्रान्सप्लांट, लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट तसेच बाल रुग्णांमधील यकृत प्रत्यारोपण या सर्वच क्षेत्रांत त्यांचे प्रावीण्य आहे. अवघ्या ६ महिन्यांचे आणि ५ किलो वजनाच्या बालकाचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. बाल यकृत प्रत्यारोपणामध्ये त्यांनी सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.
पुण्यातील अनेक ‘फर्स्ट’ त्यांच्या कार्यातून घडले आहेत. पुण्यातील पहिले यशस्वी एबीओआय लिव्हर ट्रान्सप्लांट, साइटस इन्व्हर्सस असलेल्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण, पुण्यातील पहिले पेडियाट्रिक कॅडव्हेरिक लिव्हर ट्रान्सप्लांट, लिव्हर आणि किडनीचे संयुक्त प्रत्यारोपण, रेट्रोव्हायरल पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक यकृत प्रत्यारोपण, हिमोफिलिया रुग्णामध्ये यकृत प्रत्यारोपण, स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांट, याशिवाय, यकृत कर्करोग, पित्तनलिकेच्या जखमा व कर्करोगावर होणाऱ्या जटिल हेपॅटोबिलिअरी शस्त्रक्रिया, तसेच बालरुग्णांमध्ये एचपीबी सर्जरी, शंट सर्जरी, लिव्हर रिसेक्शन या क्षेत्रांतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
जगप्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ प्रा. मोहम्मद रेला (चेन्नई) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. श्रीवास्तव यांना १४ वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांनी आजवर २ हजारहून अधिक यकृत प्रत्यारोपणांमध्ये सहभाग नोंदवला आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये डॉ. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली
अत्याधुनिक लिव्हर केअर युनिट विकसित करण्यात आले आहे. येथे यकृत प्रत्यारोपणाबरोबरच प्रिव्हेंटिव्ह लिव्हर केअर, दीर्घकालीन यकृत विकार, तसेच अक्यूट लिव्हर फेल्युअरसाठी स्वतंत्र व सुसज्ज लिव्हर आयसीयू कार्यरत आहे. गंभीर कृत आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डॉ. मनोज श्रीवास्तव हे केवळ शल्यचिकित्सक नसून, नवजीवनाचा विश्वास देणारे आशेचे प्रतीक ठरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे पुणे हे देशातील यकृत प्रत्यारोपणाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे.
